पंकजाताई म्हणाल्या , वाघांनो असं रडताय काय मी आहे ना !

बीड दि.9 ( सिटीझन ) विधान परिषदेसाठी भाजपकडून माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. मात्र ऐनवेळी उमेदवारी न मिळाल्याने  कार्यकर्तेही उद्दिग्न झाले होते. यासंदर्भात रात्री उशीरा पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत, ' वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ' अशा शब्दात भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांनाही धीर दिला आहे. ' या निर्णयाचा मला अजिबात धक्का बसला नाही ' हे सांगण्यासही त्या विसरल्या आहेत. 

भाजप नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी रात्री उशिरा केलेल्या ट्विट म्हटले आहे की, '' आईंना,ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,'तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही' बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजपच्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद! " असेही पंकजाताई यांनी स्पष्ट केले. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.