बीडमधील व्यापाऱ्यांनो, दुकान पाससाठी शिफारस पत्र पाहिजे तर अमर नाईकवाडे यांनी केलेले आवाहन वाचा !

बीड दि.4 ( सिटीझन ) जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ज्या व्यापारी बांधवांना त्यांच्या दुकानांसाठी पास मिळवण्याकरिता मुख्याधिकारी नगर परिषद, बीड यांचे शिफारस पत्र आवश्यक आहे. आशा व्यापाऱ्यांसाठी नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी महत्वाचे आवाहन केले आहे. 

अमर नाईकवाडे यांनी म्हटले आहे की, पास घेण्यासाठी व्यापारी बांधवांनी आज सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:00 या वेळेत बीड नगरपालिकेत स्वतःच्या दुकानाचे लायसन्स, स्वतःचे आधार कार्ड व स्वयंघोषणापत्र घेऊन बीड नगर परिषदेचे कर्मचारी श्री. अविनाश धांडे (9168767778)  यांच्याशी संपर्क साधावा. (स्वयंघोषणापत्र हे बीड नगर परिषदेच्या समोरील झेरॉक्स दुकानावर उपलब्ध आहे.) अत्यंत आवश्यकता असल्यासच श्री.अविनाश धांडे यांना फोनवर संपर्क साधावा असे आवाहनही नाईकवाडे यांनी केली आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.