बीड येथील जेष्ठ नगरसेवक खदीरभाई जवारीवाले यांचे निधन

आज दुपारी 3 वाजता दफनविधी
बीड दि.24 ( सिटीझन ) शहरातील ज्येष्ठ नगरसेवक अब्दुल खदीर अब्दुल गणी (खदीरभाई जवारीवाले ) यांचे आज सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी ते 54 वर्षांचे होते. आज शुक्रवारी  दुपारी 3 वाजता तकिया मस्जिद परिसरातील कब्रस्तानमध्ये त्यांचा दफनविधी करण्यात येणार आहे.

बीड शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील नगरसेवक अब्दुल खदीरभाई जवारीवाले यांना आज सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. ज्येष्ठ नगरसेवक म्हणून खदीरभाई सर्व परिचित होते. आ. संदीप क्षीरसागर यांचे ते अत्यंत विश्वासु होते. जनतेच्या कामासाठी सतत धावून जाणारे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष काम करणारे म्हणून खदिरभाई परिचित होते. त्यांच्या निधनाची माहिती कळताच सर्वांना धक्काच बसला. खदिरभाई यांच्या पाश्चात्य पत्नी, दोन मुले, तीन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. खदीरभाई यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सिटीझन परिवार सहभागी आहे. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.