बीडमध्ये टेम्पोसह 50 लाखाचा गुटखा ,तांदूळ पकडला

एलसीबीची कामगिरी : दारू विक्रीवरही कारवाई 

बीड दि.15 ( सिटीझन ) जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी अवैध धंद्याविरुद्ध कडक मोहीम हाती घेतली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकाऱ्यांनी मांजरसुंब्याकडून बीडकडे येणाऱ्या टेम्पोमध्ये गुटखा व तांदळाचे172  कट्टे असा एकूण 50 लाख 15 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर ठिकणी दारू विक्रीवरही कारवाई करण्यात आली असून एकूण 51 लाख 61 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. 

पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना  माहिती मिळाल्याने त्यांच्या आदेशावरून सपोनि. आनंद कांगुणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुप्त माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्गवरील पाली शिवारात बीडकडे येणारा टाटा टेम्पो क्र. K.A-32-0-4494 हा पकडून  19 लाख 40 हजार रु.चा तसेच मागील बाजूस असलेले  25 किलो वजनाचे  2 लाख 75 हजार रुपयांचे 172 कट्टे तांदूळ व टेम्पो असा एकूण 50 लाख15 हजार रुपयांचा मुद्देमाल  जप्त करून प,स्टे.बोड प्रामीण येथे पुढील कारवाईसाठी सुपूर्द करण्यात आला आहे.
दिनांक 14 रोजी स.पो. नि.भाऊसाहेन गोसावी व  पोलीस कर्मचारी यांनी नहारवाडी ता.बीड  शिवाराताल समर्थ हॉटेलच्या  पाठीमागे एका रुममध्ये इसम संभाजी नामदेव दुधाळ याने विनापरवाना बेकायदेशीर विदेशी दारु ताब्यात बाळून चोरुन विक्री करत असल्याने छापा टाकला. त्याचबरोबर अन्य ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.ही कामगिरी पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोदार,  अप्पर पोलीस अधीक्षक  विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखचे पो.नि. भारत राउत, सपोनि. बाळासाहेब आघाव सपोनि भाऊसाहेब गोसावी , सपोनि .आनंद कांगुणे, संतोष जोंधळे , गोविंच एकीलवाले.कर्मचारी सानप, जगताप, शेख, हंगे, केंद्रे, क्षीरसागर, कुऱ्हाडे, वाघमारे, तांदळे, रोकडे, सिद्दीकी, डोळस, सारूक, तांदळे, पवार, जायभाये,  गर्जे, कनाके , हराळे, काळे ,घुंगरट व इतरांनी केली. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.