बीडमध्ये फिरून भाजीपाला ,फळ विक्रीसाठी पूर्णवेळ परवाना देणार - जिल्हाधिकारी रेखावार

 

नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी /शेतकरी संघ / शेतकरी गट यांना शहरात पुर्ण वेळ फळे व भाजीपाला फिरुन विक्री करीता सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वेळ 

बीड दि.12 ( सिटीझन ) कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर  जिल्हयात कलम 144 आदेश लागू करण्यात आलेला आहे. संचारबंदी अंतर्गत शिथिल करण्यात आलेल्या कालावधीत जीवनावश्यक फळे व भाजीपाला यांचे खरेदी व विक्री करीता बीड शहरातील विविध ठिकाणी नगरपरिषद मार्फत ठिकाणे निश्चित करण्यात आलेली असून सदर ठिकाणी भाजीपाला विक्री होत आहे परंतु कोव्हीड-19 या रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधक उपाययोजना करणे गरजेचे आहे यामध्ये खेरेदी किंवा विक्री करताना योग्य ते
सामाजिक अंतर ठेवावे. एकच रांग करून उभे राहून भाजीपाला खरेदी करावा असे अपेक्षीत आहे, परंतु संचारबंदी अंतर्गत शिथिल करण्यात आलेल्या कालावधीत जीवनावश्यक फळे व भाजीपाला यांचे खरेदी व विक्री करीता नागरीकांची गर्दी होत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे आता नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी /शेतकरी संघ / शेतकरी गट यांना शहरात पुर्ण वेळ फळे व भाजीपाला फिरुन विक्री करीता सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठरवून दिलेल्या भागात फिरून भाजीपाला विक्रीचा परवाना दिला जाणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. 

जिल्हाधिकारी रेखावार यांनी रविवारी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री ची संकल्पना राबवत फळे व भाजीपाला यांचा सुरळीत पुरवठा होणे करीता शेतकरी उत्पादक कंपनी /शेतकरी संघ/ शेतकरी गट यांना शहरात घरोघरी फिरुन भाजीपाला व फळे विक्री करावयाचे असल्यास त्यांनी कृषी विभाग अंतर्गत कार्यरत कृषी सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ( बीटीएम), सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (एटीएम) ,मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांचे कडे आपले कडील उपलब्ध फळे/भाजीपाला/शेतीमाल याची नोंदणी करावी. नोंदणी नुसार सदर गट यांना फळे व भाजीपाला विक्रीचा परवाना व वाहन परवाना तालुका स्तरावर दिला जाईल. सदर शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपणी/शेतकरी संघ यांना दिलेल्या परवाना नुसार
सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत नेमुन दिलेल्या ठिकाणी/ विभागात फिरून भाजीपाला विक्री करावा लागेल.
यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहिल व सामाजिक अंतर राखून भाजीपाला विक्री केली जाईल याची जबाबदारी त्या गटाची राहिल, तसेच विक्री वेळी संबंधीतास तोंडाला मास्क वापरणे व हातात ग्लोव्हज घालणे व सॅनिटाझरचा वापर करणे हे बंधनकारक राहिल. या करीता तालुका स्तरावर तहसिलदार यांचे अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आलेली असून सदर समिती माफत शेतकरी उत्पादक कंपनी /शेतकरी संघ/ शेतकरी गट यांना परवाना देणे, फळे व भाजीपाला विक्रीचे ठिकाण/विभाग निश्चित करून देणे, तसेच दररोज संध्याकाळी विक्री करावयाचे फळे व भाजीपाल्याचे दुसर्या दिवसासाठीचे जिन्नसवार वाजवी दर निश्चित करुन देणेची कार्यवाहि करण्यात येईल. यामुळे शेतकरी यांना आपला भाजीपाला थेट ग्राहक यांना विक्री करता येईल व याचा लाभ सरळ शेतकरी यांना होईल तसेच यामुळे होणारी नागरीकांची गर्दी कमी होण्यास मदत होईल व नागरिकांचीही सोय होईल. फळे व भाजीपाला विक्री करताना तालुकास्तरीय समितीने ठरवुन दिलेल्या दरापेक्षा अधिक दराने विक्री करता येणार नाही. तसेच त्यांना रोजचा बाजारभाव दर्शविणारा फलक त्यांचे विक्री वाहनावर लावणे बंधनकारक राहणार आहे. पुढील तीन ते चार दिवसात अकराही तालुका मुख्यालयाच्या ठिकाणची रस्त्यावरील फळे व भाजीपाला विक्री पुर्णपणे थांबविण्यात येणार असून होणारी गर्दी लक्षात घेता आडत बाजार देखील बंद करण्यात येतील. तरी वरील प्रमाणे उपक्रमाची अंमलबजावणी सर्व संबधितानी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी  राहुल रेखावार यांनी केले आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.