बस-पिकअपच्या भीषण अपघातात चौघे ठार

केज-अंबाजोगाई रोडवरील चंदन सावरगाव येथे दुपारी घडलेली दुर्दैवी घटना 

एसटी बसच्या एका बाजूचा भाग पूर्णपणे चिरला गेला 

333333333333333333333333333333........................

केज, (प्रतिनिधी):- भरधाव वेगातील एसटी बस आणि आयशर टेम्पोची धडकेत चार जण जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास केज - अंबाजोगाई रोडवरील चंदन सावरगाव येथे घडली. मृतांमध्ये बसमधील तिघे तर टेम्पो मधील एकाचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. अपघातानंतर परिसरातील लोकांनी तातडीने जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पाठवले.  या अपघातात 15 पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत.

बीड जिल्ह्यातील केज - अंबाजोगाई रोडवरील चंदन सावरगाव जवळ एसटी बस क्र.( एमएच 20 बी एल 3721 ) ही औरंगाबादकडून केजमार्गे मुखेडकडे जात होती. त्याचवेळी समोरून कोंबड्या घेवून येणारा बोलेरो पिकअपची भीषण धडक झाली.पिकअप समोरून एव्हढ्या वेगात येत होता की एसटी बस एका बाजूने पूर्णपणे चिरली गेली. खिडक्यांच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांना गंभीर मार लागला. बसमध्ये रक्ताचा सडा पडला होता.  या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.  वेळेअभावी मयतांची नावे समजु शकले नाहीत.

 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.