राक्षसभुवन येथे गँस सीलेंडरचा स्फोट ; संसार उपयोगी वस्तु सह घर ही उधवस्त

 गेवराई (प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील गौतम कांतीलाल वाव्हळ यांच्या घरातील गँॕस सिलेंडरचा स्फोट होवुन घरातील संसार उपयोगी वस्तूसह धान्य व ईतर जीवन आवश्क वस्तु खाक झाल्या असून घर उधवस्त झाले आहे ही घटना काल दि१८रोजी दूपारी ४ वा सुमारास घडली आहे 

या घटनेच्या मिळलेल्या अधिक माहिती अशी कीदि.१८ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी गौतम वाव्हळ, रोजच्या प्रमाणे आपल्या घरात स्वयांपाक करत होत्या त्यांनी गँसवर भाजी शिजवान्यास ठेवली होती कामा निमीत्य बाहेर अंगणात आल्या अचानक घरातून धुर निघाल्याने घाबरल्या आजुबाजुचे शेजार्याना याची माहिती दिली या घटनेची चर्चा पसरत गेली तशी परिसरात घबराट पसरली होती नागरीक पळु लागले साधारण दहा मिटानी गँस सिलेडरचा स्फोट झाला स्फोटाच्या तिवृतेने राक्षसभुवन हादरून गेले होते गँस सिरेंडर च्या स्फोटा मुळे वाह्वळ यांचा संसार जळुन खाक झाला असून संसार उघड्यावर आला आहे. घटनेची माहिती मिळताच उमापुर पोलीसांनी घटना स्थळी भेटदेवुन पंचनामा केला या घटनेचा पुढील तपास फौजदार विजय जोगदंड करत आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.