जामखेड तालुक्यात स्वाईनफ्लू चा तिसरा बळी

जामखेड प्रतिनिधी
वंजारवाडी येथील आठ महीण्यांची गरोदर महिलेचा मृत्यू.

जामखेड तालुक्यात स्वाइनफ्लू अजाराने थैमान घातले असुन तालुक्यातील वंजारवाडी येथील उसतोड कामगारांची आठ महीण्यांची गरोदर असलेली पत्नी रूपाली बाळासाहेब शिंदे वय २० वर्ष यांना त्रास होऊ लागल्याने १५दि रोजी कर्जत येथील उपजिल्हाआरोग्य केंद्रात घेऊन गेले तेथे उपचार सुरू असताना दि १७ रोजी अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे दि १९रोजी स्वाईनफ्लूची तपासणी पाँझीटीव आसल्याचे डॉक्टरांनी सांगितले . त्याअनूसंगाने उपचार सुरू असताना दि २१ रोजी पहाटे उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. यामुळे तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.