आष्टीतील नगरपंचायतमध्ये शौचालय वाटपात घोटाळा

दरेकरांची तक्रार; १ कोटी ९ लाखांची अनियमितता
बीड, (प्रतिनिधी):- आष्टी नगरपंचायत अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानातील वैयक्तीक शौचालय वाटपात घोटाळा झाल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. तब्बल १ कोटी ९ लाख ९५ हजारांची अनियमितता झाली असुन त्याची चौकशी करुन दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारीत केली आहे.
आष्टी नगरपंचायत अंतर्गत सन २०१६-१७ मध्ये शौचालय वाटप करण्यात आले असुन त्याची संख्या १०४० इतकी आहे. सदर शौचालयांसाठी १५ हजार रुपये प्रति शौचालयाप्रमाणे १ कोटी ५६ लाख रुपये मंजुर करण्यात आले आहे. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून लाभार्थ्यांना ६१ लाख ६२ हजार व दुसरा हप्ता ८० लाख १९ हजार इतकी रक्कम नगरपंचायतींकडून वाटप करण्यात आली आहे. मात्र वैयक्तीक शौचालय वाटप करतांना जुनीच शौचालय नव्याने दाखवून त्यामध्ये १ कोटी ९ लाख ९५ हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार कैलास दरेकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.