जुन्या भांडणाच्या कुरापतीतून कुर्‍हाडीने प्राणघातक हल्ला

केज, (प्रतिनिधी):- जुन्या भांडणाची कुरापत काढून एकावर कुर्‍हाडीने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला. हि घटना केज केज तालुक्यातील विडा येथे घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले शिवाजी साहेबा वाघमारे यांनी फिर्यादीत नमूद केल्यानुसार दि. ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ते विडा येथील बाजार तळावर गावातील लोकांसोबत गप्पा मारत उभे असताना त्यांच्या भावकीतील गोवर्धन मुकुंद वाघमारे हा तिथे आला आणि जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करु लागला. शिवाजी वाघमारे यांनी शिव्या देऊ नकोस असे म्हणताच त्याने गोवर्धनने त्यांना मारहाण सुरु केली. तेवढ्यात गोवर्धनची मुले मिलिंद, प्रफुल्ल हे कुर्‍हाड आणि लोखंडी गज घेऊन तर कैलास मुकुंद वाघमारे, स्वप्निल कैलास वाघमारे, दयानंद कैलास वाघमारे, बाळु मुकुंद वाघमारे, राहुल बाळु वाघमारे व इतर तिघेजण (सर्व रा. विडा) हे सार्वजन काठ्या घेऊन आले आणि त्यांनी शिवाजी वाघमारे यांच्यावर हल्ला चढविला. यात कुर्‍हाडीचा मानेवर बसणारा वार चुकविल्याने तो डोक्यावर बसल्याने आणि गज, काठ्या लागून शिवाजी वाघमारे गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी त्यांच्या खिशातील रोख १२ हजार रुपये आणि एक तोळ्याची सोन्याची साखळी काढून घेतल्याचेही शिवाजी वाघमारे यांनी फिर्यादित नमूद केले आहे. याप्रकरणी सर्व आरोपींवर कलम ३०७, ३२३, ३२७, १४३,१४७,१४८,१४९ अन्वये केज पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.