ना.पंकजाताईंचा गाव तिथे विकास! परळीतील खोडवा सावरगाव येथून झाला दौर्‍याला प्रारंभ

परळी, (प्रतिनिधी):- राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या गाव तिथे विकास दौर्‍याला खोडवा सावरगाव (ता.परळी) येथून आज सुरुवात झाली आहे. दौर्‍या दरम्यान ठिकठिकाणी ना.पंकजाताईंचे स्वागत करण्यात आले. दुपारी उशिरापर्यंत त्यांचा विकास दौरा गावा-गावात दाखल होत होता.
पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांचा गाव तिथे विकास दौर्‍याला आजपासुन खोडवा सावरगाव येथून सुरुवात झाली. यावेळी खोडवा सावरगावमध्ये ठिकठिकाणी रांगोळी काढून त्यांचे स्वागत करण्यात आले. तेथील रस्त्यांवर बसवलेल्या फेवरब्लॉक कामाचे त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. खोडवा सावरगावकडे जात असतांना रस्त्यांमध्ये ठिकठिकाणी महिलांनी ना.पंकजाताईनां थांबवून त्यांचे औक्षण करत त्यांच्या विकास दौर्‍याला शुभेच्छा दिल्या.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.