मारहाणीनंतर वृद्धाचा र्‍हदयविकाराने मृत्यू; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बीड, (प्रतिनिधी):- म्हशीने ज्वारी खाल्ल्याच्या कारणावरुन पाच ते सहा जणांनी वृद्धास बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर वृद्धाचा र्‍हदयविकाराने मृत्यू झाल्याने या प्रकरणी मयताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरुन बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात काल सहा जणांविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड तालुक्यातील आहेर वडगाव शिवारात म्हशीने ज्वारी खाल्ल्याच्या कारणावरुन दि.८ मार्च रोजी विलास गंगाधर देशमुख (६०) यांना सहा जणांनी बेदम मारहाण केली. मानेवर दगडाने व बुक्क्याने मारहाण केल्यानंतर विलास देशमुख यांना र्‍हदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात दि.२३ मार्च रोजी विकास विलासराव देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रावसाहेब केशव मोरे, अशोक रावसाहेब मोरे, बाबु रावसाहेब मोरे, इंदुबाई रावसाहेब मोरे, मिना मिठू शिंदे, कौशबाई भास्कर शिंदे (सर्व रा.आहेर वडगाव) यांच्याविरुद्ध बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात मृत्यूस कारणीभुत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.