युतीशिवाय भाजपाची स्वबळावर सत्ता आणू- गिरीष महाजन

जळगाव:(प्रतिनिधी): राज्यात आम्ही त्यांचे मोठे भाऊ आहोत, हे मित्र पक्षाने समजून घेतले पाहीजे, सध्या मित्रपक्षाला सहज गोंजारतोय मात्र आगामी काळात आम्हाला युतीची गरज भासणार नाही, आम्ही स्वबळावर सत्ता मिळवू, असा टोला आज राज्याचे जलसंपदामंत्री  गिरीष महाजन यांनी शिवसेनेचे नाव न घेता लगावला. 

उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणूकीत दोन जागा विरोधकांनी मिळवल्या तेवढ्यात विरोधकांची गत 'उंदरांना चिंधीचा आधार' अशी झाली आहे. त्याच्याच सुरात सुर मिळवत शिवसेनादेखील आम्हाला डरकाळी दाखवत आहे. परंतु, आम्हाला युतीची गरज भासणार नाही, आम्ही राज्यात स्वबळावर सत्ता मिळवू असा दावा गिरीष महाजन यांनी यावेळी केला. भाजपा युतीसाठी उत्सुक नसल्याचे स्पष्ट संकेतही जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी यावेळी दिले आहेत. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.