‘आज ढोल बडवले उद्या अधिकारी बडवू’, कर्जमाफी यादीसाठी शिवसेनेचे आंदोलन

परळी । प्रतिनिधी
फडणवीस सरकार द्वारे घोषित करण्यात आलेल्या कर्जमाफीत लाभर्ती ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करा आज ढोल बडवले आणि शेतकऱ्यांची होत असलेली हेळसांड जर थांबली नाही तर अधिकारी बडवणार असल्याचा इशारा शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी दिला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी बोलताना शेतकर्यांच्या हितासाठी पालकमंत्री, विरोधी पक्षनेते दोघेही मूग गिळून गप्प का असा संतप्त सवाल करून शेतकऱ्यांशी होत असलेले व्यवहार बँकेने मराठीतच करावे अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी सह संपर्क प्रमुख सुनील धांडे, चंद्रकांत नवले उपजिल्हा प्रमुख संजय महाद्वार, बाळासाहेब अंबुरे, यांची प्रमुख उपस्थिती होती तर या ढोल बजाव आंदोलनाचे आयोजन शिवसेना तालुका प्रमुख वैजनाथ सोळंके, शहर प्रमुख राजेश विभूते, युवासेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा अतुल दुबे यांनी केले आंदोलन प्रसंगी विविध पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले फसव्या कर्जमाफीचा निषेध करत मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली, शेतकरी आत्महत्या करत आहे तरीही त्यांच्या विषयी शासन प्रशासन गाढ झोपेत आहे त्यांना जाग करण्यासाठी हे ढोल बजाव आंदोलन करण्यात असल्याचे आयोजकांनी सांगितले शिवसेना शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील आहे प्रसंगी रास्तावरही उतरण्याची भावना शिवसैनिकांनी घोषणाद्वारे व्यक्त केली.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.