अंबाजोगाईतील सावरकर मल्टीस्टेटच्या कार्यालयात चौघांचा धुडगूस एफडीचे पैसे परत द्या म्हणून कर्मचार्‍यांना शिवीगाळ करुन बाहेर काढले

बीड, (प्रतिनिधी):- अंबाजोगाई येथील स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑप सोसायटीच्या शिवाजी चौक शाखेमध्ये काल सायंकाळी चौघांनी धुडघूस घातला. एफडीचे पैसे परत द्या असे म्हणत कर्मचार्‍यांना शिवीगाळ करुन खुर्ची फेकून दिली. रोखपालास जिवे मारण्याची धमकी देत १ लाख २ हजार ५४० रुपयांचा बेअरर चेक देण्यास भाग पाडले व सर्व कर्मचार्‍यांना बाहेर काढून हाकलून देत शाखेला कुलूप लावले या प्रकरणी चौघांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अंबाजोगाई शहरातील शिवाजी चौकात असलेल्या वि.दा.सावरकर मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटीच्या कार्यालयात आलेल्या अनिल समुद्रे याने एफडीचे पैसे द्या असे म्हणत कर्मचार्‍यांना शिवीगाळ करुन खुर्ची फेकून दिली. त्याच्यासोबत असलेल्या राहूल अभिमन्यू धोत्रे याने रोखपाल विजय कोंडीराम आगळे यांना जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्या शाखेचा एक्सीस बँकेचा १ लाख २ हजार ५४० रुपयांचा बेअरर चेक देण्यास भाग पाडले. अनिल समुद्रे आणि त्याच्यासोबत असलेल्या अनोळखी दोघांनी शाखेतील सर्व कर्मचार्‍यांना बाहेर हाकलून देत शटर ओढून कुलूप लावले व चाव्या घेऊन निघून गेले. या प्रकरणी अहमदनगर येथील गणेश शंकर थोरात यांच्या फिर्यादीवरुन अनिल समुद्रे, राहुल धोत्रे व अन्य दोघांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोनि.गित्ते हे करीत आहेत.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.