शिष्यवृत्तीच्या परिक्षेत उत्तरपत्रिकेच्या वाटपात झाला घोटाळा विद्यार्थ्यांना पर्यवेक्षकांनी दबाव टाकुन गप्प बसवले

अंबाजोगाई (प्रतिनिधी) तालुक्यातील पाचवी व आठवी च्या वर्गात शिकणार्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परिक्षा महाराष्ट्र शिक्षण परिषदेने दि. १८ फेब्रुवारी पासुन घ्यायला सुरूवात केली मात्र पहिल्याच दिवशी शिष्यवृत्तीच्या परिक्षेतील उपरपत्रिका वाटपात घोटाळा झाल्याचे  उघडकीस आले  आहे. विद्यार्थ्यांना दिलेल्या उतरपत्रिकेत अदला-बदली झाल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले मात्र आपली चुक झाल्यासाठी पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना गप्प बसायला भाग पाडले शिष्यवृत्ती परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कार्यवाही व परीक्षा दुबार घेण्याची लेखी मागणी अब्दुल हाफिज सिद्दीकी यांनी शिक्षणाधिकार्‍याकडे केली आहे.
  महाराष्ट्र शिक्षण परिषद विद्यार्थ्यांच्या परिक्षघेण्याची जवाबदारी गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विस्तारअधिकारी यांच्यावर टाकणे मात्र परिक्षा प्रमुखाची नेमणुकापासून पर्यवेक्षक कोण घ्यायचे इथपर्यंत शिक्षण विभागात वशीले बाजी चालते या पद्वतीमुळे गटशिक्षणाधिकारी कार्यालय या ना त्याकारणामुळे चर्चेत राहिले आहे यापुर्वी अनेक परिक्षा झाल्या या परिक्षेला पर्यवेक्षक अथवा राखीव पर्यवेक्षक घ्यावे शिक्षण क्षेत्रासारख्या क्षेत्राला बदनाम करण्याचे काम शिक्षकाकडुन होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महाराष्ट्र शिक्षण परिषदेच्या निर्देशानुसार पाचवी व आठवी वर्गात शिकणार्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परिक्षा सुरू आहे. दि.१८ फेब्रुवारी रोजी पहिला पेपर होता परिक्षा घेण्याआधी या परिक्षेसाठी नेमलेल्या पर्यवेक्षकांना संपुर्ण प्रशिक्षण दिले होते शिष्यवृत्तीच्या परिक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तर पत्रिका दिली जाते त्या विद्यार्थ्यांचा आसन क्रमांक व उत्तरपत्रिकेचा क्रमांक एकच असतो त्यामुळे परिक्षा हॉलमध्ये पर्यवेक्षकांने काळजीपुर्वक उतरपत्रिका वाटप करावयास पाहिजे उतरपत्रिका देणे चुकले की त्याचा परिणाम निकालावर होतो यामुळे अशी चुक पहिल्याच दिवशी अंबाजोगाई शहरातील गोदावरील कुकुंलोळ शाळेतील परिक्षा हॉल मध्ये झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराहटीचे वातावरण पसरले आहे. घडलेल्या घटनेची लेखी तक्रार अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष अब्दुल हाफिज सिद्धीकी यांनी शिक्षणाधिकारी जि.प.बीड यांच्याकडे केली आहे. तक्रारीला सिद्धीकी म्हणतात की १८ फेब्रुवारी रोजी गोदावरी कुंकुलोळ शाळेतील केंद्रावर शिष्यवृत्तीची परिक्षा घेण्यात आली पहिल्या दिवशी भाषा विषय व गणित विषयाची परिक्षा होती केंद्र प्रमुख व पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आसन क्रमांकान्वये न देता इतर आसन क्रमांकाची दिली आसन क्रमांक व उतरपत्रिकेचे क्रमांक बदलले आहेत लक्षात येताच ही चुक विद्यार्थ्यांनी केंद्र प्रमुख व पर्यवेक्षकांना लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला परंतु आपली चुक उघडकीस येवू नये म्हणून पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना दाबदडप करून खाली बसवले अंबाजोगाईचे गटशिक्षणाधिकारी केंद्र प्रमुख पर्यवेक्षकाच्या मनमानी व निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे भरून न निघणारे नुकसान झाल्याने संबधिताची चौकशी करून कार्यवाही करावी चुकीच्या उतरपत्रिका दिल्याने भाषा विषय व गणित विषयाची दुबार परिक्षा घेण्यात यावी अशीही तक्रारीत सिद्धीकी यांनी मागणी केली आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.