शिवछत्रने फेडले डोळ्याचे पारणे!

बीड (प्रतिनिधी) आदर्श राज्यकर्त्याची ओळख जगाला करून देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महानाट्य सोहळ्यातून त्यांचा इतिहास जनसामान्यांसमोर ठेवला. ‘शिवछत्र’च्या महानाट्यातून महाराजांचे अनेक प्रसंग उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे ठरले. विजयसिंह पंडित यांच्या संकल्पनेतून शिवजन्मोत्सव सोहळा ‘याची देही, याची डोळा’ पाहण्याचा योग गेवराईकरांना आला.
स्वाभिमानी युवा ब्रिगेडच्यावतीने आयोजीत शिवजन्मोत्सव सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास उपस्थितांच्या डोळ्यासमोर तरळला. महाराजांच्या शौर्याचे अनेक प्रसंग साकारणार्‍या कलावंतांनी सर्वांचीच वाह वाह.. मिळवली. विजयसिंह पंडित यांनी बीडमध्येही असाच शिवजन्मोत्सव सोहळा यापूर्वी साजरा केला होता.
आदर्श पायंडा
शिवजयंतीच्या निमित्ताने विजयसिंह पंडित यांनी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करून आदर्श पायंडा घातला आहे. डिजे, मिरवणूक आदि बाबींना फाटा देत शिवरायांचा इतिहास जनसामान्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न महानाट्यातून झाला आहे. यापूर्वी बीडमध्ये अशाच शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या माध्यमातून शहरवासियांच्या डोळ्याचे पारणे फेडण्याचे काम विजयसिंहांनी केले होते. मात्र ग्रामीण भागातील लोकांनाही आपल्या राजाचा इतिहास अनुभवता यावा या उद्देशाने यावर्षी हा सोहळा गेवराईत पार पडला.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.