केज प्रकरणी चारजण गजाआड; गोव्यातील आर्या गँगशी कनेक्शन केजमध्ये व्यापार्‍यांचा कडकडीत बंद

केज (प्रतिनिधी) केज-अंबाजोगाई रस्त्यावर लुटीच्या उद्देशाने सराफा व्यापार्‍याच्या गाडीला धडक दिल्याने व्यापारी विकास थोरात यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर चोरट्यांनी दागिन्यांची पिशवी घेवून पळ काढला असता त्यातील एक जण विहिरीत पडल्याने पोलिसांच्या गळाला लागला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चके्र गतीने फिरवत आणखी तिघांना गजाआड केली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीचा गोव्यातील आर्या गँगशी कनेक्शन असल्याची माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली आहे. दरम्यान सराफा व्यापारी विकास थोरात यांना कट रचून मारल्याच्या निषेधार्थ व्यापार्‍यांनी केजमध्ये कडकडीत बंद पाळला.
बीड जिल्ह्यातील केज-अंबाजोगाई रस्त्यावर लुटीच्या उद्देशाने सराफा व्यापार्‍याच्या धडक देण्यात आली. त्यामध्ये व्यापारी विकास थोरात यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी दोघांना केजच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींकडून ३ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल युसूफवडगाव पोलिसांनी हस्तगत केला असुन आरोपींमध्ये महादेव रमेश डोंगरे (१९ रा.सोनीजवळा ता.केज), अतुल रमेश जोगदंड (२३, रा.सोनीजवळा ता.केज), अमर लक्ष्मण सुतार (३९ रा.निपाणी ता.चिकोड), प्रविण उर्फ अमोल संभाजी मोहिते (२६ रा.हुरसूर ता.कागल जि.कोल्हापूर) यांचा समावेश असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे. यातील अमर सुतार व अमोल मोहिते हे जखमी अवस्थेत केजच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहेत. आज सकाळी डिवायएसपी अजित बोराडे यांनी रूग्णालयात भेट दिली. अमोल हा सराईत गुन्हेगार असून गोवा राज्यात आर्या नावाची गँग चालवितो. त्याच्यावर कोल्हापूर येथे विविध गुन्हे दाखल आहेत. त्याठिकाणी मोक्काअंतर्गत कारवाई झाल्याने तो गेल्या एक महिन्यापासून सोनीजवळा (ता.केज) येथे नातेवाईकांकडे राहत होता. अशी माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.