स्वबळाचा बाण सुटलाय, आता माघार नाहीच- संजय राऊत

मुंबई (वृत्तसेवा) संजय राऊत यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावरही ताशेरे ओढले. जेटलींनी सादर केलेला अर्थसंकल्प फक्त कागदावरच खूप चांगला वाटतोय. सध्या देशभरात शेतकरी आत्महत्या करत आहेत. सध्यातरी अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीविषयी इतक्या लवकर निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असे राऊत यांनी सांगितले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चार केला. लोकसभा आणि विधानसभेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याच्या निर्णयापासून आम्ही मागे हटणार नाही. आता धनुष्यातून बाण सुटलाय, त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते शुक्रवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गुजरात विधानसभा निवडणूक हा ट्रेलर होता, तर गुरुवारी जाहीर झालेले राजस्थानमधील पोटनिवडणुकांचे निकाल हा इंटरव्हल होता. आता २०१९ मध्ये खरा चित्रपट पाहायला मिळेल, असेही संजय राऊत यांनी म्हटले. यावेळी संजय राऊत यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावरही ताशेरे ओढले. जेटलींनी सादर केलेला अर्थसंकल्प फक्त कागदावरच खूप चांगला वाटतोय. सध्या देशभरात शेतकरी आत्महत्या करत आहेत. सध्यातरी अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीविषयी इतक्या लवकर निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असे राऊत यांनी सांगितले.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.