अंबाजोगाईनंतर आष्टीकरांचेही आपेट यांनी केले कल्याण! लाखोंची फसवणूक; न्यायालयाने दिले गुन्हे दाखल करण्याचे आदेश

आष्टी (प्रतिनिधी) अंबाजोगाईसह अनेक ठिकाणच्या ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी शुभकल्याण मल्टीस्टेटचे चेअरमन दिलीप आपेट यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हे दाखल होवू लागले आहेत. आष्टीकरांचेही आपेट यांनी ‘कल्याण’ केले असून लाखोंच्या फसवणूक प्रकरणी आष्टी न्यायालयाने आपेटसह संचालक मंडळाविरूध्द गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे.
आष्टी न्यायालयात डॉ.संदिप रघुनाथ सानप यांनी २० जानेवारी २०१८ रोजी शुभकल्याण मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड दिलीप नगर हावरगाव (ता.कळंत जि.उस्मानाबाद) चे चेअरमन दिलीप शंकरराव आपेट व संचालक मंडळ आणि आष्टीच्या शाखाधिकार्‍याविरूध्द २५ लाखांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. त्यावर न्यायालयात दि.२९ जानेवारी २०१८ रोजी न्या.एन.एन.धेंड यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत फिर्यादीच्या वतीने ऍड.बापुराव गर्जे यांनी बाजु मांडली. त्यावर न्यायालयाने सिआरपीसी १५६ (३) नुसार शुभकल्याण मल्टीस्टेटचे चेअरमन, संचालक मंडळ व शाखाधिकारी यांच्याविरूध्द भादंवि ४२० व ३४ अन्वये गुन्हा नोंदवण्याचे आदेश पोलिस ठाण्याला दिले आहेत. या प्रकरणात फिर्यादी डॉ.सानप यांच्यावतीने ऍड.गर्जे यांनी प्रभावीपणे बाजु मांडली.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.