पटेल फाऊंडेशनच्या पाठपुराव्यामुळे शेतकरी कुटूंबाला मदत

बीड (प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगणी हवेली येथील आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटूंबाला आर्थिक मदत देण्यात आली आहे. पटेल फाऊंडेशनच्या पाठपुराव्यामुळे आज तहसिलदारांच्या उपस्थितीत शासकीय मदतीचा धनादेश कुटूंबाला प्रदान करण्यात आला.
बीड तालुक्यातील हिंगणी हवेली येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी पटेल फाऊंडेशनचे अध्यक्ष शाहेद पटेल यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. आज सकाळी तहसिल कार्यालयात तहसिलदार शिंगोटे यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी कुटूंबाला एक लाख रूपयाच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी पटेल फाऊंडेशनचे अध्यक्ष शाहेद पटेल, ऍड.शेख शफिक, ऍड.सय्यद खाजा आदिंची उपस्थिती होती.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.