केज - गुणवत्ता असेल तर जातपात आडवी येवू शकत नाही आ जयदत्त क्षीरसागर

केज- प्रतिनिधि 

अनेक ठिकाणी उर्दु माध्यमातील शाळांची प्रगती चांगल्या पद्धतीने होत आहे ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजातील लोकांसाठी काही तरी करण्याची ईच्छा शक्ती असणे ही मोठी बाब आहे ,गुणवत्ता असेल तर कूठलीही जातपात आडवी येवू शकत नाहा असे प्रतिपादन आ जयदत्त क्षीरसागर यांनी केले 

केज शहरातील नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी सत्कार व गुणवंताचा सत्कार आ जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला ,यावेळी जि प सभापती संतोष हंगे ,दिनकर कदम ,रमेश आडसकर ,अँड शेख शफिक ,नसीर ईनामदार ,नगराध्यक्ष आदित्य पाटील ,सचिन देशपांडे ,विजयकांत मुंडे ,जमील ईनामदार ,डाँ महमंद ईलियास ,एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख निझाम ,गिरीश देशपांडे आदी उपस्थित होते ,यावेळी बोलताना आ क्षीरसागर म्हणाले कि ,या संस्थेशी मी जोडलेलो आहे ,संस्थेच्या पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेवून ही संस्था नावारुपाला आणली आहे ,प्राथमिक ते ज्यूनियर काँलेज असा प्रवास करुन संस्थेने अनेक विद्यार्थी घडवले आहेत ,संस्था उभारणी करने सोपे आहे पन ती टिकवने अवघड आहे ,शिक्षण क्षेत्राशी निगडीत संस्था चालवने तारेवरची कसरतच असते ,त्यात पून्हा गुणवत्ता टिकवने हेही महत्वाचे आहे ,वेगवेगळ्या स्पर्धेत सहभाग होवून विद्यार्थी घडत आहेत ,पदाधिकारी व शिक्षकांचे श्रम आणि ईच्छा शक्ती यामुळेच संस्थेची वाटचाल यशदायी राहीली आहे ,कुठलेही काम हे प्रयत्नामुळेच होत असते अनेक उर्दू शाळा प्रगतीच्या वाटेवर आहेत ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजातील लोकांसाठी त्यांच्या विकासासाठी काही तरी करण्याची ईच्छा शक्ती असने ही मोठी उपलब्धि आहे ,कोशिश करने वालो कि हार नही होती ,माणसामधे गुणवत्तापूर्ण असेल तर कुठलीही जातपात आडवी येवू शकत नाही ,ध्येयपूर्तीसाठी गुणवत्ताच लागते ,मोठ्या घरी जन्म घेणे जरुरी नाही तर मोठेपन दाखवने जरुरीचे असते ,माणसाला माणूस बनवने आपली संस्कृति आहे ,चांगले संस्कार वाया जात नाहीत पन अहंकाराने माणूस वाया जातो असे ते म्हणाले यावेळी विद्यार्थी ,पालक व समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.