बीडमध्ये दुध वाहतुक करणार्‍या वाहनांची हवा सोडली

बीड,(प्रतिनिधी):- दुधाला ५ रुपये प्रतिलिटर दरवाढ देण्याच्या मागणीवरुन आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी ठिकठिकाणी दुधाचे टँकर अडवले. राज्यभरात आंदोलनाचा भडका उडाला असुन दुध रस्त्यावर ओतून देण्यात आले. बीडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दुध घेऊन जाणार्‍या टँकरची हवा सोडून दिली. एका रिक्षामधुन दुधाच्या पाकीटांची वाहतुक होत असल्याचे दिसताच कार्यकर्त्यांनी रिक्षा अडवून त्यातील पाकिटे काढून घेतली. इंन्फट इंडिया येथील मुलांना ती पाकिटे वाटप करण्यात आली. जिल्हाभरातील दुध संकलन बंद करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दुध आंदोलनाला मध्यरात्रीपासुन सुरुवात झाली. कोल्हापुरसह अनेक जिल्ह्यामध्ये दुध रस्त्यावर ओतून शासनाच्या भुमिकेचा निषेध नोंदविण्यात आला. बीड जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पुजा मोरे, जिल्हाध्यक्ष कुलदिप करपे, युवा जिल्हाध्यक्ष राजू गायके, महिला तालुकाध्यक्ष ज्योत्सना खोड, युवती जिल्हाध्यक्ष अश्‍विनी सपकाळ, गेवराई तालुकाध्यक्ष  राजेंद्र डाके, नितीन लाटे, उद्धव साबळे, अर्जुन सोनवणे, अमोल गायकवाड, भाऊसाहेब घुगे, धनंजय मुळे आदि पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सकाळपासुनच आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. मंजेरी फाटा येथे पदाधिकार्‍यांनी आंदोलन करत गुजरातकडून येणार्‍या दुधाच्या टँकरची हवा सोडून दिली. तेथील दुध संकलन केंद्रात जाऊन टँकरची तपासणी केली. दुधाची पाकिटे घेऊन जाणार्‍या वाहनांची झडती घेतली. एका वाहनामध्ये दुधाची पाकिटे आढळून आल्यानंतर कार्यकर्त्यांनी सर्व पाकिटे बाहेर काढून घेत इंन्फट इंडिया येथील मुलांना ती पाकिटे वाटप केली. जिल्ह्यातील २० दुध संकलन केंद्रावरील प्रक्रिया सकाळपासुन बंद होती.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.