दोन रस्त्यांचे काम मी मंजुर करुन आणले आहे. त्याचे श्रेय आमदारांनी घेवू नये

आष्टी (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोक फेक अकाउंटवरुन सोशल मिडीयावर झळकत आहेत. त्यांना ५० हजार लाईक मिळतात मात्र त्या लाईक पैसे देवून मिळवतात असा आरोप आ.सुरेश धस यांनी केला आहे. यावेळी धस यांनी भाजप आ.भिमराव धोंडे यांच्यावरही नाव न घेता जोरदार टिका केली. वनवेवाडी ते हिंगणी आणि देऊळगाव घाट ते मच्छिंद्रनाथ गड या दोन रस्त्यांचे काम मी मंजुर करुन आणले आहे. त्याचे श्रेय आमदारांनी घेवू नये असा टोलाही धसांनी लगावला.
आष्टी येथे आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत आ.सुरेश धस बोलत होते. आ. धस म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे लोक फेक अकाउंंटवर पैसे देवून सोशल मिडीयातून झळकतात. त्यांना ५० हजार इतक्या लाईक मिळतात. मात्र त्या लाईक्स पैसे देवून मिळवलेल्या असतात असा आरोप त्यांनी केला. आष्टी मतदार संघातील रस्त्यांच्या प्रश्‍नावर केंद्रिय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. वनवेवाडी ते हिंगणी आणि देऊळघाट ते मच्छिंंद्रनाथ गड या दोन रस्त्यांचे काम मी मंजुर करुन आणलेले आहेत. असे असतांनाही येथील आमदार मात्र रस्ते मंजुर करुन आणल्याचे सांगत आहेत. माझ्या कामाचे श्रेय आ.धोंडे यांनी घेवू नये असेही आ.धस यांनी यावेळी सुनावले. मागील साडेतीन वर्षात ज्यांना रस्त्याची कामे करता आली नाहीत त्यांनी आता श्रेयासाठी पुढे येवू नये असेही ते म्हणाले. पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टीत मोठा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. सध्या मोतीबिंदुमुक्त जिल्हा अभियानातर्ंगत ४० ते ५० रुग्ण नेत्र शस्त्रक्रियेसाठी आष्टीतून जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.