शिक्षण सभापतीच्या उद्देशाला अधिकार्‍यांचा हरताळ फासण्याचा प्रयत्न

गटशिक्षणाधिकार्‍या मार्फत मु.अ.ना दिला निरोप ; तालुकानिहाय एजन्सी फिक्स
अंबेजोगाई,(प्रतिनिधी)-बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी समाजातील दानशूर व्यक्तीनी जि प शाळेतील मुलांसाठी  गणवेश दान द्यावे असे आवाहन करून आठ दिवस झाले नाही तोच शिक्षण विभागातील काही अधिकार्‍यांनी गणवेशासाठी आलेल्या निधीतून गणवेश जिल्हास्तरावरून खरेदी करण्याचा घाट घातला आहे गटशिक्षणाधिकार्‍या  मार्फत मुख्याध्यापकांना तसा निरोप गेला असून तालुका  निहाय खरेदीसाठी एजन्सी फिक्स झाल्याने शिक्षण सभापती च्या उद्देशाला त्यांच्याच विभागातील  अधिकार्‍यांनी अप्रत्यक्षरीत्या हरताळ फासल्याचे शिक्षण क्षेत्रात चर्चा सुरू आहे
          बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार्‍या पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व मुली तसेच अनुसूचित जाती भटक्या विमुक्त जाती व दारिद्ररेषेखालील असणार्‍या विद्यार्थ्यांना दोन गणवेश खरेदीसाठी प्रति विद्यार्थ्यांना ६०० रुपये प्रमाणे निधी शासनाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे दिला आहे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेशाची तरतूद नसल्याने शिक्षण सभापती देशमुखांनी जिल्ह्यातील विविध सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या संस्था,  प्रतिष्ठान ,दानशूर व्यक्तीने गणवेशासाठी मदत करावी असे  जाहीर आवाहन केले होते त्यानुसार अनेक प्रतिष्ठित ,व्यापारी ,प्रतिष्ठान आदींनी सभापतीकडे गणवेश मोफत देण्याचा मनोदय व्यक्त केला होता अशी माहिती मिळते
शिक्षण विभागामध्ये अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्या कर्मचारी व अधिकार्‍यांनी फॉर्म्युला तयार केला असून वरिष्ठ पातळीवरून आलेल्या निधीतून गणवेश खरेदी करायचा त्यासाठी एजन्सीही फिक्स केल्या मात्र हा निधी थेट मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशा दोघांच्या संयुक्त नावाने असलेल्या बँक खात्यावर जातो त्या खात्याचा चेक लागतो म्हणून बीडला शिक्षण विभागाची या संदर्भात बैठक झाली या बैठकीच्या वेळी उपस्थित सर्व गटशिक्षणाधिकार्‍यांना निर्देश देण्यात आले की तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना कार्यालयात बोलवा व गणवेश खरेदी ची कल्पना द्या अनेक गटशिक्षणाधिकार्‍यांनी स्थानिक सभापती, उपसभापती चे काय ? असा सवाल केला असता ते नंतर बघू तुम्ही अगोदर मुख्याध्यापकांना कल्पना द्या असे निर्देश देण्यात आल्याचे समजते
      बीडच्या शिक्षण विभागाने तालुकानिहाय एजंट अनाधिकृतपणे फिक्स केली व प्रत्येक गटशिक्षणाधिकार्‍यांना मोबाईलवर यादी मेसेज द्वारे पाठवण्यात आली या यादीचा मेसेज शिक्षण विभागातील शिक्षकापासून ते गटशिक्षणाधिकार्‍या पर्यंत व्हायरल झाला त्या मेसेज नुसार आष्टी (अंबिका ड्रेसेस) पाटोदा (सोलापूर टेक्सटाईल) शिरूर कासार (बोरा युनिफॉर्म) बीड (परख रेडिमेड) गेवराई (रुकारी  टेक्सटाईल) माजलगाव (अंबेकर सप्लायर्स) वडवणी (चाटला क्लॉथ )धारूर (जैन युनिफॉर्म )केज (बडवे ट्रेडर्स) अंबेजोगाई (झंवर कलेक्शन ) परळी वैजनाथ (इंडिया कलेक्शन ) अशा तालुकानिहाय गणवेश पुरवठा करणार्‍या एजन्सी आहेत मात्र कायदेशीर प्रक्रिया न झाल्याने या अधिकृत एजन्सी नाहीत असाही सूर मुख्याध्यापकाशी झालेल्या चर्चेतून निघत होता
वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशानुसार आज अंबेजोगाईचे गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांची बैठक गटशिक्षणाधिकारी कार्यालयात घेतली गटशिक्षणाधिकार्यांनी वरिष्ठांच्या निर्देशाची सूचना देताच अनेक मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समिती स्थानिक पातळीवर गणवेश खरेदी करण्याचा  माणस असल्याचे बोलुन दाखवला आहे यापूर्वी  गणवेश खरेदीची प्रक्रिया  जिल्हा पातळीवर राबवली गेली होती मात्र स्थानिक नागरिक तसेच शाळा व्यवस्थापन सदस्याचा रोष आमच्या वर येतो यातून खोट्या केल्या की  मुख्याध्यापकांना बळीचा बकरा बनवला जातो त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीला  विश्वासात घेतल्याशिवाय असा निर्णय घेऊ नये असाही सूर मुख्याध्यापकांनी बैठकीत आवळला असता गटशिक्षणाधिकारी म्हणाले मीही तेच म्हणालो त्यावर  तुम्ही हा निरोप मुख्याध्यापका पर्यंत पोहोचवा बाकी आम्ही बघतो असे म्हटल्याचे बैठकीत सांगण्यात आले
 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.