गोपीनाथ मुंडे नंतरची पिढी शिवसैनीकांचा सन्मान न करणारी-खा.चंद्रकांत खैरे

सर्व जागा स्वबळावर लढणार,अंबाजोगाईत भाजप पेक्षा शिवसेना जोरात
अंबाजोगाई,(प्रतिनिधी):- गोपीनाथ मुंडे हे शिवसैनीकाचा सन्मान करणारे होते मात्र त्यांच्या नंतर भाजप मधील वरचे पक्षाचे पदाधिकारी व त्यांची पुढची पिढी सन्मान करणारी नाही असे सांगत जिल्ह्यातील सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याचे मत मराठवाडा संपर्क नेते खा.चंद्रकांत खैरे यांनी मांडले.
अंबाजोगाई,केज,परळी,माजलगाव,धारुर,वडवणी तालुक्यातील कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर बीड जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे,महीला आघाडी जिल्हा संपर्क संघटक संपदाताई गडकरी,जिल्हाप्रमुख सचीन मुळूक,परळी मतदार संघ संपर्क प्रमुख प्रकाश तेलगोटे,महीला जिल्हा संघटक रत्नमाला मुंडे,उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब अंबुरे,संजय महाद्वार,नारायण काशीद,तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, गणेश मोरे,वैजनाथ सोळंके आदींची उपस्थिती हीती.
पुढे बोलताना खा.खैरे म्हणाले की,मी स्वतः जिल्ह्यात लक्ष घालणार असुन भाजपने नुसत्या फसव्या घोषणा केल्या आहेत,मराठवाड्यातील शिवसेनेचे संख्याबळ वाढले तर राज्यात शिवसेनेची सत्ता येईल. शिवसेना आणि अंगीकृत संघटना सक्षम करा, घराघरापर्यंत पोहोचवा, बुथ यंत्रणा सक्षम करा’, असे अवाहन शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले, शिवसेना पक्षप्रमुखांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे.  त्यासाठी सक्षम संघटना बांधणी करा. भाजप घाबरलेली आहे पण झुकायला तयार नाही. भाजपची राष्ट्रवादीच्या सोबत छूपी युती आहे. धनुष्यबाण हाच उमेदवार पाहून काम करा. एकजूट होऊन काम करा. ८० टक्के समाजकारण करण्याचे काम फक्त शिवसेना करत आहे. भाजपचा विजय म्हणजे मशिनचा विजय आहे.त्यामुळे आतापर्यंत जे काही झाले ते झालेशिवसैनिकांनी आपसातील वाद मिटवा व जोमाने कामाला लागा कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना  जिल्हाप्रमुख सचीन मुळूक यांनी बीड जिल्ह्यासह अंबाजोगाई तालुक्यात आज पर्यत भाजप कडुन जिल्हाप्रमुख झाल्यानंतर निर्धार शिवशाहीचा अभियान राबवुन सर्व जुन्या शिवसैनीकांना एकत्र करण्याच काम करण्यात आले त्या नंतर भाजप सरकारच्या फसव्या कर्ज माफीचा भांडाफोड करण्यासाठी गाव,वस्ती तांड्यावर जाऊन शेतकर्यांच्या भावना जाणुन त्यांना धीर देण्यात आला तर महा आरोग्य शिबीरात प्रत्येक गावात शेकडो रुग्णांची मोफत तपासणी करुन अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले असल्याचे सांगीतले. सुत्रसंचालन गजानन मुडेगावकर यांनी केले. कार्यक्रमा नंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन खा.खैरे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी
शिवसेना ,युवासेना,महीला आघाडी,विद्यार्थी सेना ,शिक्षक सेना,किसान सेना ,कामगार सेना , उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख , शहर प्रमुख ,उपतालुका प्रमुख,उप शहर प्रमुख,विभाग प्रमुख, सर्कल प्रमुख ,शाखा प्रमुख ,बुथ प्रमुख आजी ,माजी पदाधीकारी , लोकप्रतीनिधी मोठ्या संखेने उपस्थित होते.एकुणच अनेक वर्षानंतर शिवसेनेचे जुने व नवीन कार्यकर्ते एकत्र झाल्यामुळे भगवे वातावरण झाल्यामुळे भाजप कोमात शिवसेना फॉर्मात अशी परस्थिती निर्माण झाली आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.