नागदारा येथे स्त्री जातीचे अर्भक सापडले

परळी :- तालुक्यातील मौजे नागदारा शिवारात असलेल्या सरकारी विहिरीत मृत अवस्थेत आढळून आले. याबाबत कोणाला काही माहिती असेल तर परळी ग्रामीण पोलिसांना काळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

परळी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार दि.25 एप्रिल रोजी मौजे नागदारा येथील सरकारी विहिरीत साडीच्या कपड्याने गळा अवळलेल्या अवस्थेत नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक मृत अवस्थेत आढळून आले आहे. याबाबत परळी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने नुकतेच बाळंत झालेल्या पण जवळ बाळ नसलेल्या स्त्री बद्दल माहिती द्यावी असे अवाहन पोलीस निरीक्षक सुरेश चाटे (8806774136), सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास सपकाळ (9823717218) यांनी केले आहे. तसेच परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या 02446-222236 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.