आष्टीत शोभेच्या दारूचा  भीषण स्फोट; तिन ठार ?

आष्टी  (प्रतिनिधी) आष्टी शहरातील शेकापुर रोडलगत काही शोभेची दारू विक्री करणाराचे घरे आहेत.त्या घरातील दारूच्या फट्याक्याना आज  दुपारी 4:30 च्या दरम्यान आग लागली असून वेगवेगळे आवाज त्या भागातून येते आहेत. स्फोटक दारू असल्यामुळे किती साठा आहे यांचा अंदाज नाही.पोलीसानी घटनास्थळी धाव घेतली असून कशामुळे हा प्रकार झाला हे समजू शकले नसले तर या दुर्घनेत तिन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
यात्रेनिमित्त घरामध्ये साठा केलेल्या शोभेच्या दारूचा स्फोट होऊन एकाच घरातील तीघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शहरातील दारू गल्ली येथे घडली आहे. यामध्ये सरफराज अल्लाऊद्दीन सय्यद (वय ३८), हर्जना बेगम सय्यद अल्लाऊद्दीन (वय ६०) व फैजान या १५ वर्ष मुलाचा मृतांमध्ये समावेश असल्याचे घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले. स्फोट एवढा भयानक होता की घटना घडल्यानंतर सदरील घराजवळ जाण्यासही कोणी धजवेना. शेवटी जेसीबीच्या सहाय्याने झालेली पडझड दूर करून मृतांना बाहेर काढण्यात आले. दरम्यान, जामखेड येथील नगरपालिकेचे अग्निशमन दलाची यंत्रना घटनास्थळी दाखल करण्यात आली होती. यामध्ये तीन मृतदेह आढळून आले असून सायंकाळी ६ नंतरही ढासळलेल्या भिती काढण्याचे काम सुरू होते. शहरातील शेकापूर रोडलगतच दारू गल्ली म्हणून भाग आहे. सध्या यात्रांचा कालावधी असल्याने येथील गल्लीतील घरामध्येच दारू साठा केला जाातो. शुुक्रवारी दुपारी अचानक ४:३० हा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळाहून वेगवेगळ्या स्फोटाचे आवाज ऐकण्यास मिळत होते. घरातील तिघेही मृत्यूमुखी पडल्याने नेमकी आग लागली कशामुळे झाली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.