बीडमध्ये उद्या पत्रकार बांधवांची मोफत रक्त तपासणी शाहेद पटेल यांच्या फाउंडेशनचा उपक्रम

बीड, (प्रतिनिधी):- पत्रकारिता करत असतांना दररोजच्या धावपळीत पत्रकार स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पटेल फाउंडेशनकडून सर्व पत्रकार बांधवांची मोफत रक्त तपासणी करण्यात येणार आहे. या शिबीरात विविध प्रकारच्या २६ तपासण्या केल्या जाणार आहे. उद्या दि.२५ मार्च रोजी सकाळी १० ते २ या वेळेत लाल पॅथालॉजी लॅब, लोढा कॉम्प्लेक्ससमोर, आदर्श नगर, डीपी रोड बीड येथे रक्त तपासणी शिबीर होणार आहे. पटेल फाउंडेशनचे अध्यक्ष शाहेद पटेल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात असुन सर्व पत्रकार बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
बीड येथे उद्या दि.२५ मार्च रोजी सकाळी १० ते २ या वेळेत पटेल फाउंडेशनच्यावतीने सर्व पत्रकार बांधवांच्या मोफत रक्त तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शरीरातील कोलेस्ट्रॉल, थॉयराईड, किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट आदि संदर्भात २६ प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहे. सदरील तपासणी शिबीर लाल पॅथालॉजी लॅब, लोढा कॉम्प्लेक्ससमोर, आदर्श नगर, डीपी रोड बीड येथे होत असुन प्रमुख उपस्थिती सर्व पत्रकारांची असणार आहे. या रक्त तपासणी शिबीराचा लाभ सर्व पत्रकारांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.