तडीपार गुंडाकडून बाजारपेठेत धुडगूस परळीत व्यापार्‍यांची तक्रार; शहर आणि संभाजीनगर पोलिसांचे एकमेकांकडे बोट

परळी, (प्रतिनिधी):- एका तडीपार गुंडाने बाजारपेठेत धुडगूस घालून व्यापार्‍यांना त्रास देण्याचे प्रकार सुरु केले आहेत. आज सकाळीही सदरील गुंडाने काही ठिकाणी गोंधळ घातल्याने संतापलेल्या व्यापार्‍यांनी पोलिसांना निवेदन देवून दखल घेण्याची मागणी केली. सदरील गुंड तडीपार असुनही पोलिस कसलीच कार्यवाही करत नाहीत.उलट शहर पोलिस ठाणे आणि संभाजीनगर ठाण्याचे पोलिस एकमेकांकडे बोट दाखवत व्यापार्‍यांना मानसिक त्रास देवून लागले आहेत. या प्रकरणात व्यापार्‍यांनी उद्यापासुन बाजारपेठ बेमुदत बंद ठेवण्याचा ईशारा दिला आहे.
परळी येथील बाजारपेठेत परभणी जिल्ह्यातील  राजू उफर्र् नड्या या तडीपार गुंडाकडून धुडगूस घातला जात आहे. बाजारपेठेत येणार्‍या महिलांना अश्‍लिल बोलणे, व्यापार्‍यांना खंडणी मागणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. यासंदर्भात व्यापार्‍यांनी पोलिसांना निवेदन देवून कारवाईची मागणी केली असता शहर पोलिस ठाणे आणि संभाजीनगर पोलिस ठाणे दोघेही एकमेकांकडे बोट दाखवून व्यापार्‍यांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करु लागले आहेत. व्यापार्‍यांनी संतापून उद्या दि.२५ मार्चपासुन गणेशपार भागातील बाजारपेठ बेमुदत बंद ठेवण्याचा ईशारा व्यापारी नंदकुमार रामदासी, चंदूलाल बियाणी, शिवाजी देशमुख, बाळू फुले, विष्णु मस्के, प्रदिप शेटे, विनोद कोलवार, विनोद जोशी, सुनिल कौलवार, रामाकांत कौलवार, अफजल खान, हरी सारडा, राम भंडारी, प्रकाश वर्मा, शरद कावरे आदि व्यापार्‍यांनी दिली आहे.
 
तडीपार गुंडांनाही अभय; व्यापार्‍यांचा उद्यापासुन बंद
परळी येथील गणेशपार भागात तडीपार गुंडाकडून छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांना त्रास दिला जात आहे.वारंवार धुडगूस घालणार्‍या गुंडाचा बंदोबस्त करावा अशी मागणी करुनही पोलिस दखल घेत नसल्याची व्यापार्‍यांची तक्रार आहे. सदरील गुंड हा तडीपार असुनही त्याच्यावर शहर आणि संभाजीनगर ठाण्याचे पोलिस मेहेरबान कसे? असा सवाल उपस्थित केला जात असुन उद्या दि.२५ पासुन या भागातील व्यापार्‍यांनी बाजारपेठ बेमुदत बंद ठेवण्याचा ईशारा दिला आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.