राज्यसभा निवडणूक : जाणून घ्या कोण आणि कुठे जिंकले...

नवी दिल्ली ,व्रतसेवा:  १६ राज्यांमध्ये राज्यसभेच्या ५८ जागांसाठी २३ मार्चला मतदान झाले. यात बहुतांशी उमेदवार हे बिनविरोध निवडण्यात आले. तर उत्तरप्रदेश, झारखंड आणि तेलंगणा येथे मतदान घेण्यात आले. यूपीमध्ये क्रॉस वेटिंगमुळे मतदानावेळी खूप गोंधळ झाला. यूपी, तेलंगणामध्ये विरोधामुळे काही वेळ मतदान गणना रोखण्यात आली होती. 

३३ जागांवर बिनविरोध निवडणूक 

राज्यानुसार जागांबद्दल बोलायचे झाले तर उत्तर प्रदेशमध्ये १०, बिहार आणि महाराष्ट्रात प्रत्येकी ६ - ६, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगाल ५-५ आणि गुजरात आणि कर्नाटकमधील प्रत्येक ४-४, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, ओडिशा आणि राजस्थान यातील प्रत्येकी ३-३, झारखंड २ आणि छत्तीसगड, हिमाचल, हरियाणा आणि उत्तराखंडच्या प्रत्येकी १-१ जागेवर २३ मार्चला निवडणुका झाल्या. ३३ जागांवर बिनविरोध निवडणूक झाली. याचा निकाल १५ मार्च रोजीच लागला होता. 

प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद बिनविरोध निवडण्यात आले. राज्यसभेच्या ३३ जागांसाठी उमेदवार बिनविरोध निवडण्यात आले. यात भाजप १७, काँग्रेस ४, बीजेडी ३ आणि आरजेडी २, टीडीपी २, जेडीयू २, शिवसेना, राष्ट्रवादी आणि वायएसआरसीच्या एका एका उमेदवाराचा समावेश आहे. बीजेपीकडून रविशंकर प्रसाद (बिहार), धर्मेंद्र प्रधान आणि थावरचंद गहलोत (मध्य प्रदेश), जेपी नड्डा (हिमाचल), प्रकाश जावड़ेकर (महाराष्ट्र), मनसुखभाई मांडविया आणि पुरुषोत्तम रूपाला (गुजरात)  बिनविरोध निवडण्यात आले. 

छत्तीसगडमध्ये क्रॉस वोटिंग 

भाजपाच्या राष्ट्रीय महासचिव सरोज पांडेय छत्तीसगडमधून राज्यसभेच्या एकमात्र जागेसाठी निवडणूक जिंकले आहेत. भाजपच्या उमेदवार सरोज पांडे यांना ९० पैकी ५१ मते पडली. यात भाजपचे ४९ आमदार आहेत. तसेच एक अपक्ष आमदार विमल चोपडा यांचे समर्थन प्राप्त झाले. काँग्रेसचे लेखराम साहूला ३६ मते पडली. काँग्रेसचे ३९ आमदार होते. त्यातील ३ जणांनी मत दिले नाही. 

केरळमधून एलडीएफचा विजय 

केरळमधून जेडीयूचे वीरेंद्र कुमार निवडण्यात आले. यात एका जागेसाठी निवडणुकीत माकपा प्रणीत एलडीएफकडून समर्थन प्राप्त उमेदवार वीरेंद्र कुमार यांना ८९ मते मिळाली. तर विरोधी यूडीएफ उमेदवार बी. बाबू प्रसाद ४० मत मिळाली आहेत. वीरेंद्र कुमारने बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू नेता नीतिश कुमार यांनी एनडीएशी हात मिळविल्यामुळे संसदेच्या वरिष्ठ सदनाचा राजीनामा दिला होता. 

पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि काँग्रेसचा विजय 

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या चार उमेदवारांनी विजय मिळवला आहे. टीएमसीच्या शुभाशीष यांना ५४ अबीर यांना ५२ शांतनु यांना ५१ तसेच नदीमुदल हक यांना ५२ मते पडली. काँग्रेस अभिषेक मनु सिंघवी याला ४७ मते मिळाले. सीपीएमच्या रॉबीन देव यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले.त्यांना केवळ ३० मते पडली. 

आंध्रप्रदेशमध्ये टीडीपीचा विजय 

आंध्रप्रदेशात टीडीपीचे नेता सीएम रमेश यांनी राज्यसभेच्या जागेवर विजय मिळाला आहे. 

झारखंडमध्ये काँग्रेस-भाजपला १-१ जागा 

झारखंडमधील दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी एक-एक जागा मिळाली आहे. भाजपचे समीर उरांव आणि काँग्रेसची धीरज साहू  यांनी विजय मिळविला आहे. इथे काँग्रेसने आरोप लावला आहे की झारखंड विकास मोर्चाचे आमदार प्रकाश राम यांनी प्रक्रियेचे योग्य पालन केले नाही. त्यामुळे त्याचे मत रद्द करण्यात आले. 

तेलंगाणामध्ये TRSचा तीन जागांवर कब्जा 

तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समितीच्या के.बी. प्रकाश, जे. संतोष कुमार तसेच बी. लिंगैया यादव यांनी विजय मिळवला. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.