बीड बालेपीर येथील  शेख फारूक पटेल यांचे निधन

बीड ( प्रतिनिधी ) शहरातील बालेपीर भागातील अजमेर नगर येथील रहिवाशी शेख फारूक इब्राहिम पटेल यांचे शनिवारी ( दि.24 ) सायंकाळी निधन झाले. मृत्यूसमयी ते 48 वर्षांचे होते. त्यांचा दफनविधी आज रविवारी ( दि. 25 )सकाळी 9 वाजता होणार आहे. 
बीड शहरातील बालेपीर अजमेर नगर येथील रहिवाशी शेख फारूक इब्राहिम पटेल हे शनिवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास अचानक घरासमोर पडले त्यामध्ये त्यांच्या नाकाला गंभीर दुखापत होवून रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अंत्यत मनमिळाऊ स्वभावाचे आणि धार्मिक वृत्तीचे म्हणून ते सर्व परिचित होते. त्यांचा दफनविधी रविवारी सकाळी 9 वाजता बालेपिर भागातील  दर्गाह मस्जिद येथील कब्रस्तानमध्ये  होणार आहे.शेख फारूक यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शेख कुटुंबियांच्या दुःखात सिटीझन परिवार सहभागी आहे.

रोजा ( उपवास ) असताना निधन

औरंगाबाद येथील इजतेमा शांततेत , शिस्तबद्ध व्हावा यासाठी प्रत्येक जण अल्लाहकडे दुवा करत आहे. रोजा ( उपवास ) करून प्रार्थना केली जात आहे. शेख फारूक इब्राहिम पटेल यांनीही शनिवारी रोजा करून इजतेमासाठी अल्लाहकडे दुवा मागितली मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. रोजा सोडण्याच्या वेळीच त्यांची प्राणज्योत मालवली. अल्लाहची आराधना करत असतानाच त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.