एमआयएमचे माजी शहराध्यक्ष  डॉ. इद्रीस हाश्मी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश  खा. अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत घातला गळ्यात गमचा 

बीड ( प्रतिनिधी ) एम आयएमचे माजी शहराध्यक्ष तथा त्याच पक्षाच्या स्वतंत्र गटाच्या कोट्यातून पालिकेचे स्वीकृत सदस्यपद मिळवलेले डॉ इद्रीस हाश्मी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसचा गमचा गळ्यात घातला.

बीड शहरातील एमआयएमचे माजी अध्यक्ष डॉ. इद्रीस हाश्मी यांनी आज कार्यकर्ता शिबिरात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पालिका निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या वेळी एमआयएम मधील दुफळी चव्हाट्यावर आली होती. त्यानंतर डॉ. हाश्मी यांना पक्षाने शहराध्यक्ष पदावरून हटविले होते. त्याचवेळी एमआयएमच्या स्वतंत्र गटाच्या कोट्यातून डॉ. इद्रीस हाश्मी यांची पालिकेचे  स्वीकृत सदस्यपदी निवड झाली होती. त्यानंतर काही दिवसातच स्वतंत्र गटातही बेबनाब झाल्याने ते  स्वतः एमआयएम पासून अलिप्त राहत होते. गेल्या काही दिवसांपासून समाज कार्याच्या माध्यमातून सक्रिय असलेल्या डॉ. हाश्मी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे विधानसभा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे , विश्वजित कदम , खा. रजनीताई  पाटील , माजी मंत्री अशोक पाटील , सुरेश नवले , माजी आ. सिराज देशमुख , जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी आदी उपस्थित होते.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.